रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सध्या सर्वत्र कोरोना आणि विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. कोरोनानं पाच राज्यातील निवडणुका यावेळी डिजीटल स्वरूपात प्रचाराद्वारे पार पडत आहेत. अशात काही ठिकाणी गोंधळही होताना दिसतोय.

कोरोनाचे नियम पाळून सर्वत्र सध्या काम चालू आहे. निवडणुकीच्या काळात सध्या स्पेशल रिपोर्टिंग आणि ग्राऊंड रिपोर्टिंग महत्त्वाचं आहे. अशात सोशल मीडिया देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

कधी कधी बातम्या घेण्याच्या नादात रिपोर्टरच व्हायरल होत असतात. सध्या न्यूज रूमपासून ते ग्राऊंड रिपोर्टिंग पर्यंत काहीही व्हायरल होताना दिसत आहे. अशात एक महिला रिपोर्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार कुठेतरी रिपोर्टिंग करत आहे आणि तिचा रिपोर्ट तयार करत असताना, तेव्हा अचानक गर्दीतून बाहेर येणारी एक व्यक्ती तिच्याकडे बघू एकटक बघत आहे. अन् खरा गोंधळ तर इथं होतो.

रिपोर्टर कॅमेरामॅनकडं पहात आपलं रिपोर्टिंग करत असताना अचानक त्या व्यक्तीकडं पहाते आणि ती त्याला मध्येच अडवायला लागते. अन् त्या व्यक्तीला तुम्ही हे सर्व प्रथमच पाहत आहात का?, असं म्हणत ती महिला त्यांना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येऊ नका असं सांगते.

त्या व्यक्तीला बोलल्यानंतर लगेच महिला पत्रकार आपल्या सहकाऱ्यांना कॅमेरा बंद करायला सांगत आहे. सध्या हा रिपोर्टिंगचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. परिणामी ती व्यक्ती आणि रिपोर्टर देखील प्रसिद्ध होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होण्यात पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब यांचा अगत्यानं पहिला क्रमांक येतो. चांद नवाब यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. अशात आता या महिला पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वत्र चर्चा आहे.

दरम्यान, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. महिला पत्रकारांनं ज्या प्रसंगसावधानतेनं हा प्रसंग हाताळला आहे त्याचं कौतूकही केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Meme wala (@memewalanews)

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”

अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…