भोपाळ : भाजपच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेत असतात. आताही त्यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी आम्ही खासदार झालो नाही, असं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
ज्या कामासाठी जनतेनं निवडणून दिलं आहे तेच काम आम्ही प्रामाणिकपणे करु, असं प्रज्ञा म्हणाल्या आहेत. मध्य प्रदेशमधील सिलोर येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची प्रज्ञा ठाकूर यांनी खिल्ली उडवली आहे, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंबद्दलही वक्तव्य करुन प्रज्ञांनी वाद उभा केला होता. करकरेंचा त्यांच्या कर्मामुळे मृत्यू झाल्याचं आक्षेपार्ह वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत आला होता.
दरम्यान, नथुराम गोडसे हा देशभक्त होता. आहे आणि राहिल, असा दावाही प्रज्ञा ठाकूर यांनी केला होता. त्या दाव्यावरुन मोठा वाद पेटला म्हणून त्यांनी त्याबाबत माफीही मागितली होती.
महत्वाच्या बातम्या-
-अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
-“आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी”
-रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय??- बच्चू कडू
-शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला अन् शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले- आदित्य ठाकरे
-शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा