देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

मुंबई |  देशात मुस्लिम नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही, असं स्पष्ट मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकार राजू परूळेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत राऊत बोलत होते.

मुस्लिमांमधील काही लोक देशविघातक काम करतात. तसे इतरही आहेत. पण त्यासाठी आपल्याकडं कठोर कायदे आहेत. नक्षलवादाविरुद्धही कायदे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी मोदींची आहे. कोणाला चिरडून राज्य करता येत नाही, असं राऊत म्हणाले.

मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजपशी संलग्न संस्था, संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. देशात अशांतता आणि अस्थिरता माजू शकते. अशानं एखाद्याचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद राहील, पण देश राहणार नाही. याचं भान ठेवलं पाहिजे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल

-मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!

-‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

-“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी

-“महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात”