“रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नाही, जो माणूस शरद पवारांना…”

सातारा | फलटण येथील शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाच्या समारोपावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार फटकेबाजी  केली आहे. फलटण येथील उद्योजक दिगंबर आगवणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार मला आणि जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नाही. दोन पिढ्यांचा संघर्ष करून आलेलो आहे. जो माणूस शरद पवार आणि श्रीमंत रामराजे यांच्या पुढे हरलो नाही. आंडूपांडूनी माझा नाद करू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

लाखो लोकांनी मला निवडूण दिलं आहे. मात्र, या सरकारकडून सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बारामतील वळविलेलं पाणी अडवायचं धाडस आम्ही केलं.

आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असला तरी सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येणार आहे, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाच्या समारोपावेळी केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान देखील उपस्थित होते. आजपर्यंत अनेक सरकारांनी जनतेसाठी अनेक योजना बनवल्या मात्र, योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो का?, याकडे लक्ष देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार काम करत आहे, असं  देवूसिंह चौहान म्हणाले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या आदर्शवत कार्यप्रणालीने जनतेची मन जिंकली आहेत, असंही देवूसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलताना विरोधकांनी माझा नाद करू नये. मी कदापि मागे हटणार नाही, असा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव 

घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय