लातूर | काँग्रेसचे (Congress) आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात शाब्दिक चकमक नेहमी पहायला मिळते. अनेकदा कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर टीका देखील केली आहे.
अशातच निलंगा येथील कार्यक्रमात आमदार धीरज देशमुख यांच्यावर संभाजी पाटील निलंगेकरांवर घणाघाती टीका केली आहे. धीरज देशमुखांनी नाव न घेता निलंगेकरांवर टीका केली आहे.
काँग्रेस आहे, चालत राहते, शांत आहे, पण यापुढे असं चालणार नाही. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तो पर्यंत राहू द्या, असं धीरज देशमुख म्हणाले आहेत.
विकासाच्या आड याल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू. आमचा नाद करायचा नाय. वैद्यकीय शिक्षण खातं आमच्याकडे असल्यानं इंजेक्शन कधी अन् कुठं द्यायचंय आम्हाला पक्के माहितीये असंही ते म्हणाले आहेत.
आम्ही विकासाचे राजकारण करतो, आम्ही शांत आहोत शांतच राहु द्या. उगाच आमचा नाद केला तर तुम्हाला सोडणार नाही, अशा थेट इशारा यावेळी धीरज देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, धीरज देशमुखांनी ऊसाच्या मुद्द्यावरून, कारखान्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता संभाजी पाटील निलंगेकर काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
उद्धव ठाकरे-अजित पवारांमध्ये रंगली जुगलबंदी; CM म्हणाले, “अजितदादा तुम्ही जिथं आहात तिथं…”
Stock market : आता शाळेतच विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेअर मार्केट’चे धडे
“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”
“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले…