कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा

बंगळुरू | महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही, असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील असंही येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत, असं येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली. लॉकडाऊन 4.0 ची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

-तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला

-… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

-आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग

-महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं; मुख्यमंत्र्यांची मतकरींना आदरांजली