पुणे महाराष्ट्र

माझं वाक्य उलटं वाचलं गेलं, मी म्हटलं होतं की…- चंद्रकांत पाटील

पुणे | राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. मात्र पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं करायचं हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात भाजपचं सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर विषय असो होता की निवडणुका स्वबळावर लढवणं. त्यामुळे शिवसेनाच काय इतर दुसऱ्या कोणालाही आमचा सरकार स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, पाटलांनी काल केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना एक टोला लगावला होता. त्यावर आता भाजप आमदार राम कदम यांनी पवारांवर टीका करत त्यांना भाजपतर्फे उत्तर दिलं आहे. पाटलांच्या वक्तव्यावरून वाद पेटला पण आता तर पाटलांनी असं म्हटलं की माझं वक्तव्य उलट वाचलं गेलं. मात्र पवार-कदम यांच्यात आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याहसह…; मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्या अगोदरच कोरोनाचे विघ्न!

नरेंद्र मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका

विधान परिषद मागायला भाजप नेत्यांच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांनी पाटलांवर आक्षेप घेऊ नये- राम कदम

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

“भाजपच्या राष्ट्रीय वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, भाजपने जाहीर माफी मागावी”