गुणाकारात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलं तरी लॉकडाउनमुळं गुणाकारात वाढणाऱ्या या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोणावरती पटकन संशय व्यक्त करण्याऐवजी त्या-त्या परिस्थितीचा थोडा विचार करायला पाहिजे. डॉक्टर आणि पोलीस हे सगळे जण आपल्यासाठी अत्यंत तणावाखाली मेहनत करीत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ही परिस्थिती केव्हा संपणार लॉकडाउन केव्हा संपणार याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मात्र लॉकडाउनचा आपल्याला नक्की फायदा झाला आहे. लॉकडाउनमुळं गुणाकारात वाढणार हे संकट थांबवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

दरम्यान, इतर देशांमध्ये याचा ज्या झपाट्यानं प्रसार झाला. म्हणजे दररोज मोठ्या प्रमाणावर त्या रुग्णांच्या संख्ये वाढ होत गेली. ही वाढ आपण निश्चितपणे काही स्वरुपात तरी नियंत्रणात ठेवली आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-तुमच्या आमच्यासाठी लढणाऱ्या मुंबई पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू

-3 मेपर्यंत राज्यात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत- राजेश टोपे