मुंबई | महाराष्ट्रातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे.
वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती.
सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचा टोला नवाब मलिकांनी लगावला होता. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं.
त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील आज गोदियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मलिकांना उत्तर दिलंय.
राजकारणातील सर्व लोक काचेच्या घरांत राहतात. त्यामुळे कुणीही कुणावर दगड फेकू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दगड मारताना विचार केला पाहिजे. नवाब मलिकांच्या नेत्यांना काही म्हटलं, तर यांना चालत नाही, असं म्हणत त्यांनी नवाब मलिकांना टोला लगावला आहे.
दरम्यान, मलिकांना बोललेलं चालणार नाही त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिन्दुस्थानी भाऊला मोठा झटका, कोर्टानं दिलेला निर्णय ऐकून रडू कोसळेल!
जेनेलियाने दिली गुड न्यूज! आता रितेश होणार ‘मिस्टर मम्मी’
धक्कादायक! केस वाढवल्यानं शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर
“स्त्रीयांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल”