मुंबई | महाराष्ट्र राज्यात कोणत्याना कोणत्या कारणावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी ही सुरूच असते. अशातच काल दसऱ्याच्या निमित्त दसरा मेळावा पार पडला
त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजप आणि त्यातील नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. त्यांच्या या आरोपांना भाजपनेही प्रत्युत्तर दिलं असल्याचं समजतं आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. राणेंनी त्यांच्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसत असल्याचं म्हटलं आहे.
दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर आम्हाला उद्धव ठाकरें आणि राहूल गांधी यांच्यामध्ये कोणताच फरक राहिला नाहीय. आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीच शंका नाही.
दरम्यान, जर तुम्ही युती मोडली नसतीस तर आज तुम्हीही मुख्यमंत्री झाला असता. परंतू हे तुमच्या नशिबातच नव्हत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला होता.
महत्वाच्या बातम्या-
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे
दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर
पेट्रोल-डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला, झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय