‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा व्यसायातील महिलांनी केली ‘ही’ मागणी

ब्राझील | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळला होता. परंतू पुन्हा कोरोनाने डाकं वर काढायला सुरूवात केली आहे. यामुळे जगभरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना रोगाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वत्र लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसतं आहे. यामध्ये कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्य दिले जात आहे.

अशातच ब्राझील या देशामध्ये अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. या देशातही कोरोना लसीकरणाची मोहिम राबलवली जात आहे. यासंदर्भात वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांनी आम्हालाही कोरोना लस द्यावी, अशी मागणी केली आहे.

ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे या दक्षिण पूर्वेकडील शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आंदलोनाला बसल्या आहेत. सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाच्या यादी मध्ये आमचाही समावेश करा, अशी मागणी त्या करत आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्या महिला हे आंदोलन करत असल्याचं समजत आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर ब्राझीलमधील सर्व हॉटेल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बेलो होरिजोंटे या शहरातील हजारो वेश्यांना आपली सेवा पुरवण्यासाठी भाड्याची खोली घ्यावी लागत आहे. आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स आहोत. आम्ही अर्थव्यवस्था चालवत आहोत. त्यामुळे आमच्या आरोग्याची जोखीम मोठी आहे. तसेच आमच्या डोक्यावरही टांगती तलवार असल्याचं मिनास गॅरेस राज्यातील वेश्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा सीडा विएरा यांनी म्हटलं आहे.

सरकारने लसीकरनासाठी प्राथमिक गटात आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींचा समावेश केला आहे. आम्ही रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि आपलं आयुष्य धो.क्यात घालतो. आम्ही प्राथमिक गटाचा एक भाग आहोत. त्यामुळे आमचाही प्राथमिक गटात सहभाग करून घ्यावा, असं वेश्या महिलांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ब्राझीलमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोना रोगामुळे 3 लाख 32 हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या विळख्यात सापडला ‘हा’ प्रसिद्ध…

इंधनांच्या किंमतींमुळे गाडी चालवणं परवडत नाही? मग…

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने…

अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

‘ओ तेरी’! अनुष्कानं पति विराटला एकदा नाहीतर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy