“कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”

नवी दिल्ली | राजकारणात कोण कोणावर टीका करेल आणि काय वक्तव्य करेल याचा काही भरवसा नाही. सध्या एका काॅंग्रेस आमदारानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे.

झारखंडच्या जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी यांनी अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बोलताना अन्सारी यांची जीभ घसरली असून सध्या यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार, असं वादग्रस्त वक्तव्य डॉ. इरफान अन्सारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

जामताडामधील जनता यापुढे रस्त्यावरील धूळ अनुभवणार नाही, असा दावा डॉ. इरफान अन्सारी यांनी केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते जास्त सुंदर बनवले जातील. या रस्त्यांमुळे आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल.

आमदार अन्सारी यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्याच्या बांधकामानिमित्त बोलताना त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही रस्त्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यावरुन राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं.

शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यावरुन हेमा मालिनीचा उल्लेख केला होता. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं वक्तव्य गुलाबराव यांनी केलं होतं.

हेमा मालिनीच्या गालाची रस्त्ययांशी तुलना केल्यानं गुलाबराव यांच्यावर अनेक टीका करण्यात आली. शेवटी त्यांनी या वादग्रस्त वक्तव्याची माफी मागितली.

महत्त्वाच्या बातम्या – 

  राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल

  Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  ‘या’ देशात मास्क आणि लसीपासून सूटका, सरकारचा मोठा निर्णय

  कॉमेडी किंग कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपट, ‘हे’ असणार नाव

  त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?