‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. त्यात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून गुवाहाटील असलेला शिंदे गट आज त्यांचा मुक्काम गोव्याला हलवणार आहे. तत्पूर्वी शिंदे गटाने आज कामाख्या मंदिरात जात देवीचं दर्शन घेतलं.

यावेळी एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमच्याकडे 50 आमदार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी कामाख्या देवीकडे मागणे केले आहे, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्या बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

उद्या सकाळी 11 वाजता बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यापूर्वी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर थोडाच वेळात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तानाट्याला काय वळण लागणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?

आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…

राज्यपालांनी मारली मेख! पत्रातील ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट