मुंबई | सध्या राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे. तीव्र उष्णतेची लाट पहायला मिळत असून नागरिकांची लाही लाही होत असल्याचं चित्र आहे.
वाढणाऱ्या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पारा अचानक घसरला आहे. रविवारी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. आजही असंच काहीसं वातावरण असणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे.
मुंबईत कुलाबा, सांताक्रूझ, नाशिक, कोल्हापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढच्या काही तासांमध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
असनी चक्रीवादळाचा देशातील काही राज्यांमध्य़े हवामानावर परिणाम होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांसह अनेक ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 2 दिवसांत तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचे संकेत हवामान खात्यानं दिले आहेत.
दरम्यान, पुढील 12 तासात चक्रीवादळात रुपांतराची शक्यता. IMD द्वारे ट्रॅक अंदाज येथे दिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य
लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ
“फक्त म्हणायला ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेतं पवार सरकार”