राज्यात पावसाच्या सरी बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सूनचे आगमन झाल्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळाला आहे.

नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही मान्सूनचं आगमन झालं असून अमरावती शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असून नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा देखील सुखावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ, गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”

किर्तनावेळी व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला इंदुरीकर महाराजांचा सज्जड दम, म्हणाले…

भाजपला धक्का देत ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश