हवामान खात्याचा इशारा! पुढील काही तासांत ‘या’ भागात होणार अतिवृष्टी

पुणे |  गेल्यावर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे नुकसान होतं.

आताकुठे कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊस डोकं वर काढायला सुरुवात करत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात तापनात मोठा बदल घडल्यामुळे काही भागात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी राज्यातील तापमानाचा पारा घसराला आहे. त्यामुळे मुंबईसह, पुणे, विदर्भ, मराठावाडा या भागाला दिलासा मिळाला आहे. परंतू राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊसाने चांगलीच हजेरही लावली आहे.

राज्यातील पुढील काही तासांत अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील  नाशिक, पुणे, अमहदनगर, सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड.

या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार ते पाच तासांत वीजेच्या कडकडाटासह पवासाची शक्यता आहे. ही माहिती हवामान विभागाचे तज्ञ के.के. होसळीकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एका ट्विटव्दारे दिली आहे.

दरम्यान, काल 12 एप्रिल रोजी मराठवाडा आणि विर्दभ या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. तसेच याठीकाणी अवकाळी  पाऊसाचा पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘हा’ लूक पाहून चाहते…

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून…

घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर कशी काळजी घ्याल?, वाचा…

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला…

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…