नवी दिल्ली | कोणीतरी अगदी बरोबरच बोललं आहे की, वय ही फक्त एक संकल्पना आहे. त्यावरून तुमच्या वयाचा काही एक संबंध नसतो. या गोष्टी अनेक व्यक्ती वेळोवेळी सिद्ध करत असतात. काही लोकांचे वय साठीच्या पुढे असते, पण त्यांचे मन पूर्णपणे तरुणच असते.
त्यांचा उत्साह हा एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच असतो. तुम्हाला आता एका अशाच जोडप्याविषयी सांगणार आहे. ज्या जोडप्याने समाजाने आणि लोकांनी बनवलेल्या काही गोष्टींना छेद दिला आहे.
त्यांनी एक नवा विचार समाजासमोर ठेवला आहे. केरळमधील एका सुंदर जोडपे आहे. त्यांच्या लग्नाला ५८ वर्ष पूर्ण झाले आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात नवीन गोष्ट काय आहे. हे तर लग्न झालेल्या प्रत्येकाच होतंच. पण त्या जोडप्याने नुकतेच लग्नाचे फोटोशूट केले आहे.
त्यांनी केलेल्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. केरळमध्ये इडुक्की जिल्ह्यात चिन्नमा आणि कोचिकुट्टी हे जोडपे राहते. मागच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ५८ वर्ष पूर्ण झाले. पण एवढे वर्ष लग्नाला होऊन त्यांच्याजवळ लग्नाचा एकही फोटो नव्हता.
एकही फोटो नव्हता, जो आपल्या आठवणीत राहिल. मग कोचिकुट्टी यांना वाटू लागले की, आपणही लग्नाचे फोटोशूट करायला हवे. कोचिकुट्टी यांनी विचार केलेल्या या गोष्टीला त्यांच्या नातवाने मदत केली. Athreya हे स्वतः एक छायाचित्रकार आहे. तसेच इन्स्टाग्रामवर त्यांची मोठा चाहता वर्ग आहे.
जेव्हा त्याने आपल्या आजी-आजोबा बोलताना ही गोष्ट ऐकली. त्यानंतर Athreya याने ठरवले की, आजी-आजोबांना पुन्हा लग्नाचे कपडे घालून अगदी तसच तयार करायचे. मग त्यानंतर त्यांचे फोटोशूट करायचे. या फोटोशूटमध्ये Athreya यांच्या मित्रांनीही त्याला मदत केली.
त्यांनी आजी-आजोबा यांना चांगले तयार करून एका चांगल्या ठिकाणी नेऊन फोटो काढले. आजोबांनी काळा सूट घातला होता तर आजींनी सुंदर पांढऱ्या रंगाची क्रीम साडी घातली होती. ही केरळची सिग्नेचर साडी आहे. फोटो पाहून कुणी म्हणणार नाही की, त्यांच्या लग्नाला एवढे वर्ष झाले असतील.
त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर नुकतेच लग्न झालेल्या नव जोडप्याप्रमाणे उत्साह आणि आनंद दिसत आहे. हे फोटोशूट लोकांना इतके आवडले की, सर्वजण ते शेअर करत आहे. एका नातवाने खरंच आपल्या आजी-आजोबांना एक सुवर्ण आठवणींचा खजिना दिला आहे, यात शंकाच नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!
मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…
साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?
रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा
मराठी रंगभूमीवर पुन्हा शोककळा! ‘हा’ बडा अभिनेता काळाच्या पडद्याआड