थॉयरॉईडमुळं वजन वाढतंय, मग घ्या ‘ही’ काळजी

सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली सध्या अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉइड हा जणू काय सर्वसामान्य आजार बनला आहे. थायरॉईडच्या १०० रुग्णांमध्ये ८० रुग्ण या महिला असतात.

थॉयरॉईड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. शरीर किती वेगाने ऊर्जा खर्च करते, शरीरात किती प्रोटिन तयार होतात आणि अन्य हार्मोन्सच्या बाबतीत शरीर किती संवेदनशील आहे, या बाबींवर या ग्रंथीचे नियंत्रण असते.

संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि नियमित आयोडीन सेवन केल्याने थायरॉईडवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. थायरॉईड रूग्णांना वजनावर नियंत्रण ठेवणे मुश्किल असते. वाढत्या वजनाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारात काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.

१. जास्त पाणी प्या – जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते. शरीर हायड्रेट राहते. हायड्रेशन हे अधिक यशस्वी वजन कमी करण्याच्या प्रयत्नांशी निगडीत आहे. जास्त पाणी पिल्यानं शरीर सुदृढ राहते.

२. फॅटी फिशचे सेवन करा – चरबीयुक्त माशांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेटिव्ह, अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. हे गुणधर्म मेंदूला सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचवतात. यासाठी साल्मन, टुना, हेरिंग्स माशांचे सेवन करु शकता. यात आयोडीनदेखील असते. हे थायरॉईड नियंत्रित करू शकते. तसेच वजन कमी करण्यास याची मदत होते.

३. मशरूम खा – थायरॉईड आणि मधुमेह रूग्णांसाठी मशरुम एक प्रकारचे वरदानच आहे. त्यामुळे आपल्या आहारात नक्कीच मशरूमचा समावेश करा. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, सेलेनियम, जिंक, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स, अँटी डायबिटीक, अँटी व्हायरल, अँटी कॅन्सर आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म बर्‍याच रोगांमध्ये तंदुरुस्त ठेवण्यास फायदेशीर ठरतात.

४. फायबरयुक्त पदार्थ खा –  फायबर भूक कमी करते तर प्रथिनांमुळे ताकद वाढते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने भूकेची समस्या दूर होते. आपल्या आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा अधिक समावेश ठेवा.

महत्वाच्या बातम्या – 

“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

जाणून घ्या! कांद्याच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी…

‘या’ अभिनेत्रीनं केली होती कंडोमची पहिली…

मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईलाचं पळवलं अन्…..