मुंबई | सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचं एक माध्यम समजलं जातं. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करून जातात तर काही व्हिडीओ आपल्याला थरारक अनुभव देऊन जातात. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
प्राण्यांचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या देखील चांगलेच पसंतीस पडतात आणि खूप वेगानं व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका वाघाच्या फजितीचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
वाघ हा जंगली प्राण्यांच्यातील सर्वात जास्त हिंस्त्र प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघाचा रुबाब पाहून अनेकजण घाबरतात. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये वाघाच्या या रुबाबाची चांगलीच फजिती झाली आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक वाघ जंगलामध्ये बर्फावरून मोठ्या रुबाबात चालला आहे. वाघाचं बर्फावरचं चालणं पाहून जणू तो बर्फावर रॅम्प वॉक करत असल्याचा भास होत आहे. बर्फावर थोडं चालल्यानंतर वाघाचा पाय घसरू लागतो. यामुळे तो जपून पाऊले टाकतो.
मात्र, वाघाचा अचानक बर्फात पाय जातो आणि तो पाण्यात घसरतो. पाया खालचा बर्फ अचानक आतमध्ये गेल्याने वाघाची अशी फजिती होते. मोठ्या ऐटीत चालणाऱ्या वाघाची यावेळी चांगलीच धांदल उडते.
पाण्यात पडताच हा वाघ मोठ्या शिताफीने बाहेर येतो. पाण्यात बाहेर आल्यानंतर देखील तो वाघ त्या बर्फाकडे पाहत राहतो. यावेळी वाघ खूप घाबरला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ Nature and Animals या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने व्हिडीओ शेअर करताना यावर मजेशीर कॅप्शन देखील दिला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव तर केलाच आहे. सोबतच या व्हिडिओला भरभरून लाईक देखील केलं आहे. तुम्ही देखील हा मजेशीर व्हिडीओ नक्की पहा.
Tiger walking on thin ice, what could go wrong? pic.twitter.com/wP3FRzbESL
— Nature & Animals🌴 (@AnimalsWorId) April 13, 2021
महत्वाच्या बातम्या –
भर चौकात पोलिसांनी जोडप्यावर गोळीबार केला! पाहा नेमकं काय घडलं?
IPL 2021: ….म्हणून अभिनेता शाहरुख खाननं मागितली केकेआरच्या चाहत्यांची माफी
अभिनेत्री नोरा फतेही आणि माधूरीनं केला ‘या’…
भल्या मोठ्या सिंहाने त्यांच्या अंगावर झेप घेतली अन्…
‘या’ मुलीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल