बंगळरू | सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात.
आपल्याला माहित आहे की, बऱ्याच लोकांना प्राणी खूप आवडतात. काही तर टीव्हीवर प्राण्यांचे कार्यक्रम पाहत असतात. काहीजणांना नुसत झुरळाचं जरी नाव काढलं जरी घाबरायला होतं. तसेच आपल्यासमोर एखादा साप आला तरी काही लोक पळून जातात.
परंतू सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक साप पकडणारा तरूण एका ठिकाणचा साप पकडायला आला असल्याचं दिसून येतं आहे.
त्या तरूणाने आपल्या हातात असलेल्या एका काठीने घरात शिरलेल्या सापाला त्या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं त्या सापाची बाहेर आलेली शेपटी आपल्या हातात धरली आणि त्याला बाहेर ओढलं. त्यानंतर तो साप बाहेर आल्यानंतर सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला.
शेपटी धरून बाहेर काढलेला साप, साप नसून एक भला मोठा कोब्रा असल्याचं लक्षात आलं. हे पाहून तो साप पकडणारा तरूण देखील घाबरला आणि तो लगेचंच दोन-तीन पाऊलं मागे गेल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ दोन लाख लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंट देखील केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
न्यूज वेबसाईट, यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; भाजपच्या सुनील मानेंची मागणी
पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…
…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात