ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल प्रत्येकाकडे स्वत:च्या गाड्या असतात. असं कोणच नसेल की, त्याच्याकडे त्याची गाडी नसेल. याचमुळे लोक आपल्याला हवी तशी आणि हव्या त्या स्पिडने गाडी चालवतात.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. अशातच एक याच संदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचं पाणी होणार आहे. इतकच नाही तर यापूर्वी तुम्ही याप्रकारचा व्हिडीओ पाहिलाही नसेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक टॅम्पो आणि मोठ्या ट्रकचा अपघात होताना पाहायला मिळत आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सुरूवातीला हायवे वरून एक ट्रक चाललेला असतो. काही वेळानंतर त्याच्या मागून एक टॅम्पो खूप वेगात येत असतो. तो ट्रकच्या पुढे जाण्यासाठी आणखिण आपल्या गाडीचं स्पिड वाढतो. टॅम्पो चालकाच्या डोक्यात त्या ट्रकला ओव्हरटेक करून आपण त्याच्या पुढे, असं त्याला वाटत होतं.

परंतू टॅम्पोनं ज्यावेळी त्याला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. नेमकं त्याचवेळी तो ट्रक आपल्या उजव्या बाजूला वळला. म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला एक रोड होता आणि त्या ट्रक ड्रायव्हरला त्या दिशेनं जायचं होतं. नेमका टॅम्पोही उजव्या बाजूनेच येत असल्यामुळे त्या दोघांची खूप जोरोत धडक झाली.

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. परंतू या अपघातावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, अती घाई संकटात नेई.

हा व्हिडीओ एका युट्यूब यूजरने आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला खूप लोकांनी पाहिलं असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्सही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता