महाराष्ट्र Top news मुंबई

मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; कोल्हापूरमधील घटनेनं खळबळ

Walk e1637990993444

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये मन हेलावणारी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला गटेरेसवर मॉर्निंग वॉक करत असताना, समतोल बिघडून संबंधित तरुण थेट जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे.

भल्या सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही मन हेलावणारी घटना कोल्हापूर शहरातील महाडिक वसाहतीत घडली आहे.

प्रवीण प्रकाश महाडिक असं मृत पावलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत महाडिक हे कोल्हापूर शहरातील महाडिक वसाहतीतील रहिवासी असून गोकूळ दुध संघाच्या पशुखाद्य विभागात नोकरीस आहेत.

महाडिक यांना व्यायामाची आवड असून ते नेहमी आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन व्यायाम करतात. नेहमी प्रमाणे ते शुक्रवारी सकाळी देखील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करत होते.

दरम्यान व्यायाम करत असताना, समतोल बिघडून ते तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर कोसळलं. या दुर्दैवी घटनेच महाडिक गंभीर जखमी झालं.

महाडिक टेरेसवरून पडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

याठिकाणी उपचार सुरू असताना प्रवीण महाडिक यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी सीपीआर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल 

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत 

“मोदींनी एकदा दाढी हलवल्यावर 50 लाख घरं पडतात, अन् दुसऱ्यांदा हलवली की…” 

“राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार” 

मोठी बातमी! नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा जोरदार झटका