कोलकाता | एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारविरोधात निदर्शने देणाऱ्या नागरिकांना केलं आहे.
अम्फान चक्रीवादाळामुले पश्चिम बंगालमध्ये जवळपास 1 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलंय.
राज्य सरकार दिवस-रात्र संपूर्ण परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व सुरळीत होईल. कृपया शांतता राखा. याव्यक्तीरिक्त मी तुम्हाला एकच सांगेल की, एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सहकार्याची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
-‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच
-“केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?”
-जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत- उद्धव ठाकरे
-‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण