“शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं?”; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चिला जात आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांमध्ये जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. त्यावरून विरोधकांनी टीकेचे रान उठवले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

आता मराठा समाजाला कळून चुकलं की, पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळ्यांना कळून चुकणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आता असा आव आणायचा की, मीच तारणहार आहे. शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साठी काय केलं?,असे प्रश्न चंद्रकांत पाटलांनी केले आहेत.

जातीजातीमध्ये संघर्ष निर्माण करून त्यांना एकमेकांसोबत लढवायचं. हाच उद्योग आयुष्यभर केलेल्या शरद पवारांकडून काय अपेक्षा करायची, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केला आहे.

भाजपला समाजामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं. मात्र, भाजप कधीही त्यांच्या डावात सापडलेली नाही. भाजप समाजातील सर्व स्तरामध्ये वाढत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, एवढ्या तुमच्या संस्था आहेत. त्यात एक निर्णय करुन टाका ना मराठा समाजाला इतके इतके टक्के देणार. त्याचं काही ऑन पेपरही आणावं लागत नाही. न्यायालयातही कोणी जाणार नाही. परंतु, तुमची इच्छाचं नाही, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रवी राणा यांना भेटताच नवनीत राणांना अश्रू अनावर, 12 दिवसांनंतर पती-पत्नीची भेट

‘भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात फडणवीस सरकार जबाबदार’, शरद पवारांचा गंभीर आरोप

…म्हणून तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा लिलावती रूग्णालयात दाखल

“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

“काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं