Top news देश

एक प्लेट चाटवरुन दोन गटात तुंबळ हा.णामा.री; पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@7ru7h_1

लखनऊ | आजकाल सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा हा.णामा.रीचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक हा.णामा.रीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तुम्ही आजपर्यंत एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू, हा फेमस डायलॉग अनेकदा ऐकला असेल. परंतू हा व्हायरल झालेला व्हि़डीओ तुम्ही पाहिलात तर तुम्ही म्हणाल एक प्लेट चाट की किमत तुम क्या जानो रमेश बाबू. कारण या व्हिडीओमधील हा.णामा.री ही एक प्लेट चाटवरुन झाली आहे.

उत्तर प्रदेशच्या बागपत परिसरामधील एका मंडईत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही हाणामारी सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी दोन चाट दुकानदारांच्यात वा.द झाला असल्यामुळे झाली असल्याचे समोर येत आहे.

एका दुकानदारानं दुसऱ्या दुकानात जाणाऱ्या ग्राहकाला स्वत: कडे बोलावल्यानं वा.दाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांनी परिसरात यु.द्ध सुरु असल्यासारखं वाटत होते. दोन दुकानदारांमध्ये झालेल्या हा.णामा.रीत काही वेळानंतर अनेकांनी त्या भां.डणात स्वत:चे हात धुवून घेतले.

लोकांच्या हातात काठ्या दिसत असून, ते एकमेकांना त्या काठ्यांनी मा.रत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. काही काही लोक तर एकमेकांच्या अंगावर पडून मा.रामा.री करत आहेत. या व्हिडीओमध्ये मागे वॉईस ओव्हर लावला असल्याचं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानी ‘डब्लू डब्लू ई बाघपत’ असं कॅपशन दिलं आहे.

परिसरात या अशा प्रकारची हा.णामा.री सुरु असल्यामुळे रस्त्यावरील लोक आवरजून थांबून पाहत आहेत. त्यातील काहीजण आपल्या हातातील काम बाजूला ठेऊन सुरु असलेली भां.डणं पाहत असल्याचही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शाब्दिक वादाचं रुपांतर हा.णामा.रीत झालं असल्याचे समजत आहे. या हा.णामा.रीमध्ये एक हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेली आणि मोठे केस असलेली एक व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीच्या हेअर स्टाईलची चर्चा सुरु झाली आहे. त्या व्यक्तीची हेअर स्टाईलची तुलना विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनलस्टाईलशी केली आहे.

त्या व्यक्तीचं नाव हरेंद्र आहे. या घटणेविषयी बोलताना हरेंद्र म्हणाला कि, एक-दोन महिन्यांपूर्वी माझ्या दुकानासमोर आणखी एक चाटचं दुकान सुरु झालं. माझ्या दुकानात शिळ्या पदार्थांपासून तयार केला जातो, असं सांगून समोरचा दुकानवाला ग्राहकांना त्याच्याकडे न्यायचा. ही बाब माझ्या लक्षात येताच मी त्याला विरोध केला तर त्याने मला मा.रहा.ण करायला सुरुवात केली.


महत्वाच्या बातम्या-

बाबो! सोन्या-चांदीच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ