काय सांगता! 819 रुपयांचा सिलेंडर 719 रुपयांत मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेल बरोबरंच आता देशांतर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. यामुळे ‘कॉमन मॅन’ चांगलाच त्रस्त झाला आहे.

आज घरोघरी स्वयंपाक बनवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, गॅस सिलेंडरच्या वाढत्या भावामुळे सिलेंडर खरेदी करणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं होत चाललं आहे. सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचं बजेट देखील कोलमडत आहे.

2021 मध्ये विनाअनुदानित गॅसच्या किंमती तब्बल 225 रुपयांनी वाढल्या आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर 819 रुपयांवर पोहचले आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट आयडिया सांगणार आहोत ज्यामुळे  819 रुपयांचा सिलेंडर तुम्हाला केवळ 719 रुपयांत मिळेल.

पेटीएम तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आलं आहे. ज्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडर तब्बल 700 रुपयांनी स्वस्त मिळेल.  यासाठी प्रथम तुम्हाला पेटीएम चालू करणं गरजेचं आहे. पेटीएम चालू केल्यानंतर तुम्हाला पेटीएमवरुन गॅस बुक करुन 819 रुपयांचं पेमेंट करुन गॅस खरेदी करावा लागेल.

यानंतर तुम्हाला पेटीएमवर 700 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. म्हणजेच हा गॅस तुम्हाला मात्र 119 रुपयांमध्ये मिळेल. ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चो.रीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे.

एलपीजी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना सिलेंडर घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅसचं फक्त बुकिंग केल्यास गॅस मिळत होता. मात्र, आता फक्त गॅसच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंडर दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाहह! आता एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक देखील रस्त्यावर धावणार, लूक देखील आहे अगदी भन्नाट

तरुणी उंटासोबत सेल्फी काढायला गेली अन् उंटाने केस धरून तिला…; पाहा व्हिडीओ

कोंबडी पाठीवर असताना मगरीने अचानक जबडा उघडला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

…अन् मलायका पँट न घालताच टेबलवर येऊन बसली; मलायकाने शेअर केला तो भन्नाट किस्सा

जाणून घ्या! चणे खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे