काय सांगता! एकटा कुत्रा चक्क दोन-तीन वाघांना भिडला, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, वाघाला जंगलातील सगळेच प्राणी घाबरतात. त्याने एक डकराळी जरी फोडली तरी आजूबाजूचे प्राणी आपली वाट बदलतात.

परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर सगळं याच्या उलटच घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. यामध्ये चक्क एक कुत्रा दोन-तीन वाघांना भिडला असल्याचं दिसून येतं आहे.

एका खडकाळ ठिकाणी एक कुत्रा बसला आहे. त्याठिकाणी काही वेळानंतर एक माघून एक असे दोन-तीन वाघ येतात आणि त्या कुत्र्याला विळखा घालून उभे राहतात. एवढे भलेमोठे वाघ समोर असूनही तो कुत्रा थोडाही घाबरला नसल्याचं पाहायला मिळतं आहे.

त्या तीन-चार वाघांपैकी एक वाघ त्या कुत्र्याच्या तोंडासमोर जातो आणि त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एवढं होऊनही तो कुत्रा जागचा हलतही नाहीय. कुत्र्याचा हा निर्भिडपणा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

तसेच कुत्र्याचा आणि वाघांचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.instagram.com/reel/CU6SrSMpaPV/?utm_source=ig_embed&ig_rid=7ee22a39-8114-4ba1-a78e-12b40aef20ed

महत्वाच्या बातम्या-

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

मोदी सरकारचा मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनी देखील विकणार

मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण…- शरद पवार

‘अजूनी यौवनात मी…’; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

…ते महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील- असदुद्दीन ओवैसी