काय सांगता! चक्क एका बैलाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, स्टंट करण हे सोपं नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जे स्टंट आपल्याला पाहताना सोपे वाटतात परंतू प्रत्यक्षात मात्र तेवढेते सोपे नसतात. त्यासाठी अनेकवेळा सरावही करावा लागतो.

सोशल मीडियावर मुलांचे वेगवेगळे स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर असे असतात की, त्यांच्यावर आपला विश्वासच बसणार नाही.

परंतू यापूर्वी तुम्ही कधी एका बैलाला कोणता स्टंट करताना पाहिलं आहे का?, नसेल पाहिलं तर आता तुम्ही पाहू शकता. कारण सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एक बैल स्टंट करत असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी दोन बैल बांधलेली आहेत. परंतू त्यांच्या चारही बाजूने एक मोठी दगडाची भिंत असल्याचं पाहायला मिळतं आहे. ती भिंत असल्यामुळे बाहेरच्या माणसाला, माणसाला नाहीतर कोणत्या जनावारालाही आतमध्ये येत नाहीय.

मात्र असं असतानाही एक बैल स्टंट करत एवढी मोठी दगडाची भिंत पार करत तो आत शिरला. त्या बैलाने पुढे उडी न घेता, पहिले मागचे दोन्ही पाय भिंतीच्या वर टाकले त्यानंतर पुढचे दोन पाय आत घेतले. बैलाचा हा अनोखा आणि आश्चर्यकारक स्टंट पाहून अनेकांनी तोंडात बोटंच घातली आहेत.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, अनेक लोकांनी हा व्हिडीओ लाईकही केला आहे.

https://www.instagram.com/reel/CUQQjzwDCc2/?utm_source=ig_embed&ig_rid=19c6fc73-c6cc-4a97-a607-dc1feca5acdd

महत्वाच्या बातम्या-

‘रॉकिंग आई’ आईशी पंगा घेणं मुलाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

लग्नात नवरा सोडून नवरीने दीरांसोबतच केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! स्पर्धा जिंकण्यासाठी तरूणाने केला जीघेणा प्रयत्न, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

स्केटींग करता करता तरूण-तरूणीने केला भन्नात डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! सायकल चालवताना तरूणाने केला अनोखा स्टंट, पाहा व्हिडीओ