काय सांगता! बंदुकीच्या धाकावर आमिर खानचं 70 लाखांचं घड्याळ लुटलं; CCTV फुटेज समोर

लंडन | पाश्चिमात्य देशांमध्ये मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. मोठ्या प्रमाणात लूटमारीच्या आणि खूनाच्या घटना वाढल्याचं इंटरपोलच्या रिपोर्टनुसार समोर आलं होतं. अशातच आता ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

बंदुकीचा धाक दाखवत ब्रिटनचा बॉक्सर आमिर खान याचे (British Boxer Amir Khan) 70 लाखांचं घड्याळ लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुटमारीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं पहायला मिळतंय.

मुळ पाकिस्तानी वंशाचा असलेला 35 वर्षीय ब्रिटिश बॉक्सर आमिर खान सध्या लंडनमध्ये आहे. अनेक विक्रम नावावर असलेल्या आमिर खानला बंदुकीचा धाक दाखवत लुटमार करण्यात आली.

आमिर खान आणि त्याची पत्नी रेस्टॉरंटमधून घरी जात असताना लुटेरे त्याठिकाणी पोहोचले. चोरट्यांनी बंदुक आमिरवर लावली आणि घड्याळ काढण्यास सांगितलं.

घड्याळ हाती लागताच चोरट्यांनी पळ काढला. अवघ्या काही सेकंदात ही घटना घडली. काहींना नेमकं काय झालं हे कळलं देखील नाही.

दरम्यान, आमिर खानच्या चोरीला गेलेल्या घड्याळात 719 हिरे होते. 19 कॅरेट सोन्याचे हे घड्याळ होतं, अशी माहिती मिळाली आहे. त्यावर आता ब्रिटनचे पोलीस तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

जाॅस द बाॅस! बटलरकडून दिल्लीच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण, वादळी शतक झळकावलं

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…

“राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष बनेल”

भर सभेत अजित पवारांच्या वक्तव्यानं लोकांना हसू आवरेना, म्हणाले…

“बदाम खाऊन मला अक्कल आली की…”; अभिनेता अमेय वाघची पोस्ट चर्चेत