मुंबई | कॉमेडियन भारती सिंगने अगदी कमी वेळात मनोरंजन विश्वात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. दर्शकांना नेहमी हसवत ठेवण्याची कला भारतीमध्ये आहे. तिने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये होस्टींग देखील केलं आहे. कायम जोक्समुळे प्रेक्षकांना हसवत राहणाऱ्या भारतीचे अनेक फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीचे व्हायरल होणारे हे फोटोज पाहूण सर्वचजण आश्चर्यचकीत होत आहेत. कारण या फोटोमध्ये दिसणारा भारतीतील बदल हा डोळ्यांवर विश्वास न ठेवण्यासारखाच आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोत भारतीचं वजन प्रचंड कमी झालेलं दिसत आहे.
भारतीने लॉकडाऊनमध्ये तब्बल 15 किलो वजन कमी केल्याची माहिती भारतीने दिली आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना भारती म्हणाली होती की, माझे वजन आता 91 किलोवरून 76 किलोवर आलं आहे. माझं एवढं वजन कमी झाल्याचं ऐकून मलाच आश्चर्य वाटलं होतं.
परंतु वजन कमी झाल्यानंतर आता मला खूप मस्त वाटत आहे. मला आता निरोगी वाटत आहे. तसेच वजन कमी झाल्याने माझा मधुमेह आणि दम्याचा त्रास देखील कमी झाला आहे, असं भारती माध्यमांशी बोलताना म्हणाली होती.
पुढे भारती म्हणाली होती की, माझ्या शरिराने आतापर्यंत खूप काही खाल्ले आहे. मात्र, मी लॉकडाऊनमध्ये खाण्यावर कंट्रोल ठेवला. कडक डाइट प्लॅन फॉलो केला. आता माझ्या शरिराला याची सवय झाली आहे.
दरम्यान, भारतीच्या या फॅट टू फीटमागे तिची कडक मेहनत कारणीभूत आहे. तिने स्वत:च वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. भारती संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत काहिही खात नाही. परंतु त्यानंतर ती खाण्यावर तुटून पडते, अशी माहिती भारतीने एका कार्यक्रमात दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?
पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…
…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात