काय सांगता! कोबी एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

फळभाज्यांमध्ये कोबीची भाजी म्हटलं की लहानांसह मोठी माणसं सुद्धा नाक मुरडतात. परंतू हीच कोबीची भाजी जरी अनेकांना नावडती असली तरी ती आरोग्यासाठी खूप लाभदायी असते. कोबी खाल्ल्याने अनेक लहान मोठे आजार बरे होतात. आज जाणून घेऊयात कोबी खाण्याचे फायदे.

कोबीमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे तसेच अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे कोबीचे सेवन आरोग्यदायी ठरते. तसेच रोजच्या आहारात कोबीचा समावेश केल्यास शरीरातील ‘सी’ जीवनसत्वाची 50% गरज पूर्ण केली जाऊ शकते.

कोबीमुळे आतड्याचा कर्करोग नियंत्रणात राहू शकतो. तसेच कोबीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोबीच्या सेवनाने मज्जातंतू आणि मेंदूचे काम देखील व्यवस्थित चालते. तसेच कोबीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

जर छातीत कफ झाला असेल तर कोबीचे सेवन नक्की करावे. यामुळे शरीरातील कफ पातळ होण्यास मदत होते. तसेच कोबीमुळे पोट साफ राहते आणि पचनक्रिया देखील सुरळीत चालते.

महत्वाच्या बातम्या-

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…