मुंबई | सोशल मीडियावर खूप वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्सचे व्हिडीओ असतात. तर कधी गाण म्हणतानाचे. यामध्ये भांडणाचेही व्हिडीओ असतात.त्यातील काही व्हिडीओतर अंगावर काटा आणणारे देखील असतात.
आपण याआधी भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये माणसा-माणसांमधील भांडण, तर कधी प्राण्यांमधील भांडणं. आपल्याला माहित आहे की, बिबट्या हा खूप वेगवान आणि चपाळ प्राणी म्हणून ओळखला जातो. एकदा कोणता प्राणी बिबट्याच्या डोळ्यात भरला, तर तो त्याची शिकार केल्याशिवाय राहत नाही.
परंतू काय तुम्हाला माहित आहे का बिबट्या जंगलातील कोणत्या प्रण्याला घोबरतो?. नसेल माहित तर आता एक व्हिडीओ पाहल्यानंतर तुम्हाला ते कळेलंच. सध्या याच संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जंगलात बिबट्या एका नीलगाईला घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेला असल्याचं दिसून येतं आहे. नीलगाई बिबट्याला आपल्या दोन शिंगांनी मागे ढकलतं आहे. बिबट्याही त्याच्याकडून खूप प्रयत्न करत आहे. परंतू नीलगाईसमोर त्याची सर्व ताकद कमी पडत आहे.
काही काळ त्या दोघांमध्ये असंच सुरू राहत त्यानंतर अचानक नीलगाईल बिबट्यावर जोरात धावून जाते. तिचं ते पिसाळलेलं रूप पाहून बिबट्याची घाबरगुंडी होतो आणि तो तिथून धूम ठोकतो. यावेळी बिबट्याचा भित्रा भागोबा झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत जवळजवळ 7 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असल्याचं समजतं आहे. तसेच या व्हिडीओमधील बिबट्याची हालत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केले काही सवाल, पाहा व्हिडीओ
चक्क नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरूण अन्…, पाहा व्हिडीओ
एकावं ते नवलंच! चक्क कुत्र्यानं केलं वृक्षारोपण, पाहा व्हायरल व्हिडीओ
तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ