काय सांगता! तब्बल चार-पाच सिंहांनी गाडीला घातला विळखा अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, सिंह जंगलातील राजा आहे. त्याला जंगलातील सगळेच प्राणी घाबरतात.

व्हायरल होत असेलेल्या व्हिडीओमध्ये चार-पाच सिंहांनी चक्क एका कारला घेरलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी उभी आहे. त्या गाडीवर पुढच्या बाजूने एक भलामोठा सिंह उभा राहिला आहे.

एवढच नाहीतर त्या गाडीच्या दोन्ही बाजूस एक-एक सिंह असल्याचं दिसून येतं आहे. त्यातील एक सिंह त्या गाडीमध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू गाडीच्या चारही खिंडक्य बंद असल्यामुळे त्याला आत शिरता येत नाहीय.

त्याचप्रमाणे खिडक्यांच्या काचा काळ्या असल्यामुळे त्यांना गाडीच्या आत कोणी बसलेलं आहे की नाही हे देखील दिसत नसल्याचं लक्षात येतं आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटक आकाऊंटवरून शेअर केला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे सरकार जागरुक राहिल्यानेच कोरोना आटोक्यात आला”

“RSS शाखेत शिकण्यासारखं काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात”

आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो- राम कदम

“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”

“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”