काय सांगता! ‘या’ ठिकाणी फक्त 10 रुपयात गर्लफ्रेंड भाड्याने मिळतात

बीजिंग |  चीनमधून नेहमीच काही न काही विचित्र घटना समोर येत असतात. चीन मधील अनेक नवल वाटाव्या अशा गोष्टींच्या जगभर चर्चा चालू असतात. अशातच आता चीनमधील अशीच एक विचित्र गोष्ट आता समोर आली आहे.

पैसे असेल तर काय शक्य नाही. पैशामुळे आपल्याला अनेक गोष्टी खरेदी करता येतात. पैसा असेल तर ऐशोआरामाच्या गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेत असतात. मात्र, केव्हा तुम्ही एखाद्या दुकानात गर्लफ्रेंड भाड्याने मिळू शकते, असा विचार तरी केला आहे का?

पण ही गोष्ट सत्य आहे. चीनमधील एका मॉलमध्ये आता ग्राहकांसाठी गर्लफ्रेंड भाड्याने दिली जाते. चीनमधील ही विचित्र गोष्ट सर्व जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वत्रच चीन मधील या मॉलची चर्चा चालू आहे.

आजच्या तरुण वर्गात आपल्यालाही गर्लफ्रेंड असावी, असं फ्याड आहे. अनेकांना वाटत असतं की, आपल्याला देखील गर्लफ्रेंड असावी. तिला घेवून आपण मॉलमध्ये फिरावं, कॉलेजमध्ये जावं. तरुण वर्गाची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी चीनमधील एका मॉलने गर्लफ्रेंड भाड्यानं देणं सुरु केलं आहे.

चीनच्या गुआडोंग येथील मॉलने ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. चीन मधील या मॉलमध्ये तुम्हाला केवळ 10 रुपयांमध्ये गर्लफ्रेंड भाड्याने मिळते. पण गर्लफ्रेंड भाड्याने घेण्यसाठी या मॉलने अनेक नियम लावले आहेत.

गुआडोंग येथील या स्टोअर मध्ये मुली एका ओळीमध्ये उभ्या राहिलेल्या असतात. यातील जी मुलगी आवडेल तिला निवडू शकता. तुम्हाला त्या मुलीला घेवून जाण्यसाठी तिच्या मोबाईल वरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. यानंतर तुम्हाला 20 मिनिटाचे 10 रुपये जमा करावे लागतात.

मात्र, मुलीला घेवून जाताना काही अटी लावण्यात आलेल्या आहेत. तुम्ही त्या मुलीला जास्त लांब घेवून जावू शकत नाही. तसेच तिला जर काही खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ते स्वखर्चाने तिला घेवून द्यावे लागेल.

तिला भूक लागली असेल तर तिला तुम्हाला जेवण द्यावे लागेल. त्या मुलीच्या परवानगी शिवाय तुम्ही त्या मुलीला स्पर्श देखील करू शकत नाही. 20 मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला जर आणखी वेळ हवा असेल तर तुम्हाला पुन्हा पैसे भरावे लागतात.

महत्त्वाच्या बातम्या-

“राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र; शरद पवारांचं नाव त्याच कटाचा भाग”

टोल नाक्यावर गाडी आडवली म्हणून थोबाडीत मारली; ‘या’ महिला नेत्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

‘UPA प्रमुख म्हणून माझी निवड होणार..’; UPAच्या अध्यक्ष पदावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार? आता ‘या’ बड्या कॉंग्रेस नेत्याचं थेट वक्तव्य, म्हणाले…

‘पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच…’; UPAच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवारांचं नाव येताच अजित पवारांचं मोठं वक्तव्य!