काय सांगता! चार महिन्यात सोनं साडेसात हजाराहून अधिक तर चांदी पंधरा हजाराहून अधिक उतरली; वाचा सविस्तर

मुंबई | भारतीय स्त्रियांना सोन्याचे दागिने घालण्याची एक वेगळीच हौस असते. कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

मात्र, ग्राहकांसाठी आता एक खुशखबर आहे. सोन्याच्या किंमती आता मागील उच्चांकी स्तरावरून मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. सध्याच्या किंमतीनुसार तुलना केल्यास उच्चांकी स्तरावरून सोन्यात 7776 रुपये प्रती 10 ग्रॅममागे घसरण झाली आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीत देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चांदीच्या किंमतीत जवळपास 15412 रुपयांनी घसरलं आहे. सोन्या चांदीच्या उतरलेल्या किमतींमुळे आता ग्राहकांची सोनचांदी खरेदी करण्यास झुंबड उडाली आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात 52 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर 49,172 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात एमसीएक्सवर प्रती किलोमागे 78 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा दर 63,813 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा जागीच मृ.त्यू

खुशखबर! “डिसेंबर मध्येच लशीला परवानगी मिळेल अन् जानेवारीत लशीकरण चालू होईल” – आदर पुनावाला

धनंजय मुंडेंची लहान बहिणीला भावनिक साद, पंकजा मुंडेंचा काय प्रतिसाद?

धक्कादायक! आणखी एका बड्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृ.त्यू