Top news कोरोना देश विदेश

काय सांगता! जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही?

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. या महामा.रीचा फटका भारत देशालाही तितक्याच मोठ्या प्रमाणात बसला आहे. भारतातील लाखो लोक या महिमा.रीचा शिकार झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटत होती. मात्र, आता अचानक कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानं विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कोरोनाकाळात अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. कोरोनाविषयी बरेच लोक अवैज्ञानिक तर्क वितर्क लावत आहेत. यामुळे सामान्य लोकांच्या मनात कोरोनाविषयी प्रचंड भीती तयार होत आहे. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होता आहे.

सध्या वेगवेगळ्या विधानांचा एक कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, आत्तापर्यंत जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही. मात्र, या दाव्यामागे तिळमात्र देखील सत्य नाही.

व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये असं दाखवलं जात आहे की, WHOच्या कथित अहवालानुसार जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोनाने ग्रासलं नाही.

तसेच या पोस्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रतिनिधीचा फोटो देत असा दावा केला जात आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत लोक मांस खात राहतील तोपर्यंत त्यांना एखाद्या प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

मात्र, या व्हायरल होणाऱ्या पोस्टची पडताळणी केली असता यामागे काहीही सत्य नसल्याचं आढळून आलं आहे. इंटरनेटवर पडताळणी केली असता डब्लूएचओचा कोणताच अहवाल असा दावा करत नाही. तसेच कोणताही अधिकृत मीडिया अहवाल देखील असं सांगत नाही.

17 मार्च 2020 रोजी इकॉनॉमिक टाइम्सचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालात एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं होतं की, चिकन, मासे, अंडी खाऊन कोरोना होतो ही एक निवळ अफवा आहे.

दरम्यान, सध्या कोरोना महामारीविषयी अफवाच जास्त पसरवल्या जात असल्यानं लोकांच्या मनात भीती तयार होत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यागोदर त्याची पडताळणी केली पाहिजे, असं मत अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!

कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…