काय सांगता! रणबीर-आलियाचं लग्न झालंय?; आलिया स्वत: म्हणाली…

मुंबई । भारतीय चित्रपट सृष्टी म्हणजेच बॉलिवूड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेलं आहे. त्याला कारणंही तशीच असतात बॉलिवूडमधील कलाकारांची प्रेमप्रकरणं आणि त्यावर रंगलेल्या गप्पा गोष्टी आवडीने पाहिल्या जातात.

अनेक सेलिब्रिटींचे लाखो चाहते आपल्या देशात आणि देशाबाहेर पहायला मिळतात. त्यामधील काहीवेळा ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या समोर येत असतात. त्यातील काही जण लग्न सुद्धा करतात. अशातच अभिनेत्री आलिया भट्ट अशा वृत्तामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. कारण या दोघांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसापासून चांगल्याच रंगल्या आहेत.

दरम्यान स्वत: अलियाने मी रणबीरसोबत लग्न केलं असं म्हटलंय. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अलिया सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. त्यामुळे अनेक त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.

नुकतंच आलियाने एका वृत्तामध्ये मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये आलियाला अनेक प्रश्न विचारण्य़ात आले होते. त्यामध्ये तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर, मी तर रणबीरशी केव्हाचं लग्न केलंय, असं ऐकताच चाहत्याच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. परंतु आलिया नंतर सांगितलं की तिने रणबीरशी मनानेच लग्न केल्याचं तिने म्हटलं.

रणबीर कपूर म्हटला की, आत्तापर्यंत आमच लग्न झालं असतं पण कोरोनामुळे आमच लग्न होऊ शकलं नाही. तसेच दोघेही येत्या एप्रिल मध्ये लग्न करणार आहे असं वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत बॉलिवूड अनेक कारणांनी चर्चेत आल आहे. यात क्रिकेटर आणि अभिनेत्री याच्यात एक वेगळच नातं असल्याच पहायला मिळलं असून त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा पण पहायला मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मुलींनी स्कर्ट घालणं त्यांना नकोय, जीन्स घालणं नकोय, मग एखादं…”; आव्हाडांनी सुचवला पर्याय

“मला विद्या बालनसोबत ‘तो’ हाॅट सीन करायचाय”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

“तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”; हिजाब वादात कंगना रणौतनची उडी

  “महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती अन्…”

  मास्क खरोखर बंद होणार?, अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती