काय सांगता! मांजरीने चक्क ‘या’ प्राण्याला पाहून ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक भलीमोठी मांजर चक्क एका लहानशा पोपटाला घाबरत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका ठिकाणी एक मांजर थांबलेली आहे. ती शांतपणे उभी राहिली असून, ती आपली शेपटी हालवत इकडं-तिकडं पाहत आहे. तेवढ्यात त्याचठिकाणी एक पोपट त्या मांजरीच्या मागे येऊन उभा राहतो.

मांजर आपली शेपटी हालवत असलेल्यामुळे त्या पोपटाचे लक्ष त्याकडे जाते आणि त्याला ते काहीतरी वेगळं वाटत असल्यामुळे, तोही त्या शेपटीकडे टकलावून पाहत असल्याचं दिसून येतं आहे. त्यानंतर तो पोपट त्या शेपटी खाण्याचा प्रयत्न करत आहे, हे करत असताना तो हळू-हळू पुढे जातो.

जसा तो पोपट पुढे जातो, तसं त्या मांजरीला आपल्या मागे कोणीतरी उभा असल्याची चाहूल लागते. मागे वळून पाहिल्यानंतर तिला तो पोपट आपली शेपटी त्याच्या चोचीत धरणार असल्याचं कळताच ती तिथून पळून जाते. पोपटाला पाहून मांजरीची झालेली अवस्शा पाहून अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

https://twitter.com/MackBeckyComedy/status/1445767145946710026?s=20&fbclid=IwAR1Z43_h3cMlT7F5pmihOTGuNfUX1yMyYclaBKe_Du10DsoO0aVEB_rh24k

महत्वाच्या बातम्या-

‘भाजपमध्ये लोकशाहीला जागा उरली नाही’; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

‘या’ नागरिकांनी कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यावा; WHO ने दिला सल्ला

सोनं घेण्याची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, जाणून घ्या अधिक

भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ