मुंबई | इंस्टंट मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा जवळपास आज सर्रास वापर केला जातो. अनेकजण हा मेसेजिंग अॅप वापरतात. वैयक्तिक कामांबरोबर व्यावसायिक कामांसाठी देखील मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. मात्र, आता काही स्मार्टफोन युजर्सला मोठा धक्का बसणार आहे.
व्हॉट्सअॅप मेसेंजिंग अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करतं. आतापर्यंत सर्वच अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोनवर व्हॉट्सअॅप चालत होते. मात्र, आता काही ठरविक मोबाईल्समध्ये ही सेवा बंद करण्यात येणार आहे.
जर अशा मोबाईल युजर्सला व्हॉट्सअॅप चालू ठेवायचे असेल तर त्यांना त्यांचे मोबाईल अपग्रेड करावे लागतील किंवा सिस्टीम अपडेट करावी लागेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
व्हॉट्सअॅप कंपनी सतत आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी त्यात नवनवीन अपडेट आणत असते. मात्र, कंपनीचे असे म्हणणे आहे की, अत्यंत जुन्या मोबाईलमध्ये हे नवे फीचर्स आणि पॅच डेटा येवू शकत नाही. त्यामुळे त्यातील सपोर्ट देखील बंद करण्यात येईल.
व्हॉट्सअॅप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, IOS 9 पेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या आयफोनवर आणि 4.0.3 व्हर्जनपेक्षा जुना सॉफ्टवेअर असणाऱ्या अँड्रॉइड फोनवर आता व्हॉट्सअॅप सपोर्ट दिला जाणार नाही.
IOS 9 पेक्षा जुन्या व्हर्जनचे आयफोन आणि 4.0.3 व्हर्जनपेक्षा जुने सॉफ्टवेअर असणारेअँड्रॉइड फोन युजर्स जगभरात खूप कमी आहे. यामुळे व्हॉट्सअॅप कंपनीच्या या निर्णयाचा फटका फार कमी लोकांना बसणार आहे.
दरम्यान, तुम्ही देखील तुमच्या मोबाईलचं व्हर्जन तपासून घ्या आणि सॉफ्टवेअर अपडेट दाखवत असेल तर ते करून घ्या. मात्र, तुम्ही वापरत असणाऱ्या जुन्या फोनचे अपडेट उपलब्ध नसेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल अपग्रेड करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
- जिओची धमाका ऑफर! 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग, 24 GB डेटा आणि बरंच काही…
- अरे वा!!! वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरली, वाचा आजचा दर
- 2021 मध्ये एसयुव्ही गाड्यांचा धुराळा! ‘या’ बड्या कंपन्या करणार अनेक एसयुव्ही लॉंच
- टोयोटानं आणली सर्वात स्वस्त कार; एकदा चार्ज केल्यावर इतकी किमी धावणार!
- …म्हणून पो.लिसांनी आरो.पीच्या अंगावर सोडला सा.प; हलक्या का.ळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका!