‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली | देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे.

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बिपीन रावत यांचा अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर चौकशी होईल पण प्रथमिक माहिती आता समोर आलीये. त्यानुसार रावत ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्याला लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते.

सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ रावत हे आज दिल्लीहून वेलिंग्टन डिफेन्स कॉलेजला गेले होते. त्यासाठी ते पहिल्यांदा कोईंबतूरला जाण्यासाठी सुलूर एअरफोर्स बेसला पोहोचले.

कुन्नूरच्या वेलिंग्टनला जाण्यासाठी सुलूरहून रवाना झाले. त्यासाठी MI-17V5 हेलिकॉप्टरवर ते सवार झाले. सुलूर ते वेलिंग्टन हा फ्लाईटनं अंतर आहे 56 किलोमीटर. त्यासाठी साधारपणे 34 मिनिट लागतात.

जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरनं 32 मिनिटांचा प्रवास पूर्णही केला. सगळं काही वेळेवर चाललेलं होतं. लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते. त्यांना जिथं पोहोचायचं होतं, ते ठिकाण फक्त 10 किलो मीटरवर होतं. जनरल रावतसह सर्वांनाच आता आपण दीड ते दोन मिनिटात लँड होऊ असं वाटत असतानाच, हेलिकॉप्टरमध्ये काही तरी बिघाड झाला आणि ते खाली कोसळलं.

जनरल रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधूलिका, ब्रिगेडीयर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंहसुद्धा होते. काही पर्सनल सेक्युरिटी अधिकारी होते. एकूण हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा