जळगाव | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला होता. मुक्ताईनगर मधील चांगदेव भागात ही घटना घडली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला होता. हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं होतं.
त्यावर आता रोहिणी खडसे यांनी काल रात्री नेमकं काय झालं, याबद्दल माहिती दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
चांगदेवला एका कार्यकर्त्याच्या हळदीसाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अनेकांनी तुमच्या विरोधात वातावरण तयार केलं जात असल्याचं सांगितलं होतं.
एका थाॅर्ट कट रस्त्यावरून निघत असताना तीन दुचाकी अचानक आमच्या समोर आल्या. त्यांनी आमची गाडी अडवली. एका दुचाकीवर तीन जण होते आणि दोन दुचाकीवर दोन जण होते, अशी माहिती रोहिणी खडसेंनी दिली आहे.
तिन्ही वेगवेळ्या दिशेने ते आले होते. त्यावेळी एकाच्या हातात बंदुक होती, एकाच्या हातात तलवार होती. तर एकाच्या हातात राॅड होता. गाडीची काच तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असंही त्या म्हणाल्या.
राॅडने काच तोडण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्यावर बंदूक ताणली. मला जीवे मारण्याच्या हेतूने ते आले होते. मी खाली वाकून बसले म्हणून मी वाचू शकले, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर मी ड्रायव्हरला गाडी पळवायला लावली आणि आम्ही पोलीस येईपर्यंत फरार झालो, असंही रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे
“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”
राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी