‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी शिवसेनेविरोधातच मोठं बंड पुकारलं आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. पण आता शिवसेनेतील नाराज असलेले आणि इच्छुक असलेले आमदार सुद्धा शिंदेंना मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. याआधी शिंदेंची नाराजी समोर आली होती. यानंतर निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल झाले. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नाराजीच्या मागचं कारण सांगितलं आहे.

आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत, असं ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर आले होते, त्यांना मी भेटलो. तुम्ही एकीकडे माणसं बोलण्यासाठी पाठवली आहे आणि दुसरीकडे मला गटनेतेपदावरून हटवलं. माझे पुतळे जाळले जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.

मी आजही बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहणार आहे. आनंद दिघे यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काल आज आणि उद्या आम्ही शिवसैनिकच असणार आहोत. आमची सुरुवात ही हिंदुत्वाची होती. यात कोणतीही तडजोड करणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत 

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण 

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार? 

‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय… 

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं