Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर

मुंबई | देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (Budget 2022) उद्या मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण उद्या सकाळी 11 वाजता बजेट मांडण्यास सुरूवात करतील. काही वर्षांपूर्वी बजेट 28 फेब्रूवारीला सादर केलं जात होतं. मात्र, आता बजेट 1 फेब्रुवारीला मांडलं जातं.

बजेटला अधिकृतरित्या ‘अॅन्यूयल फायनान्शिअल स्टेटमेंट’ असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर बजेट म्हणजे देशाच्या जमा आणि खर्चाचा एक रिपोर्ट असतो. बजेटमध्ये मुख्यत्वे दोन भाग असतात.

पुढील वर्षी देशात पैसा अंदाजे किती आणि कोणकोणत्या माध्यमातून येणार आहे, हे सांगितलं जातं. देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, देशाचा चालू जीडीपी काय आहे, आगामी वर्षामध्ये सरकारला किती महसूल मिेळेल, याची माहिती पहिल्या भागात मिळते.

अर्थसंकल्पात संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान यांसारख्या अनेक विभागासाठीच्या योजना सादर केल्या जातात. यामध्ये अनेक नवनवीन घोषणा देखील होतात. तर काही योजनांचा कालावधी वाढवला जातो.

अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा दुसऱ्या भागात डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याबद्दलच्या घोषणा केल्या जातात. किती उत्पन्नावर किती टॅक्स लागणार याचे स्तर निश्चित केले जातात. त्यामुळे नेमका किती पैसा येणार याचा अंदाज बांधला जातो.

कॉर्पोरेट टॅक्स, खासगीकरण, कॉर्पोरेट टॅक्स, आरबीआयचा निधी, परदेशातून येणारं कर्ज किंवा कर्जावर मिळणाऱ्या व्याजावर सरकारला उत्पन्न मिळतं. फायनान्स बिल मांडल्यानंतर हे बिल दोन्ही सभागृहात पास व्हावं लागतं. यावर नंतर विस्तृत चर्चा देखील होते.

आता या अर्थसंकल्पातून तुम्हाला काय फायदा होतो, हे पाहणं देखील गरजेचं आहे. अर्थमंत्री ज्यावेळेला बजेट सादर करतात, त्यावेळी काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याची अप्रत्यक्ष माहिती देतात. त्यानुसार देशातील विविध वस्तूंच्या किंमती ठरतात.

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात टॅक्सचे स्लॅब ठरवले जातात. त्यावेळी वार्षिक उत्पन्नच्या स्लॅबमध्ये टॅक्स रेट बदलले जातात. त्यामुळे याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होतो. कोरोनामुळे सध्या सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे यंदाच्या निर्णयामुळे सामान्य जनतेवर काय परिणाम होतो, हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प लोकसभेत सादर केल्यानंतर राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवला जातो. त्यावेळी दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा होते. त्यावर अर्थमंत्री उत्तर देखील देतात आणि अखेरीस 1 एप्रिलला नवा अर्थसंकल्प लागू होतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं