Lavender Marriage म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या भारतात का होतो असा अनोखा विवाह

मुंबई | राजकुमार राव आणि भूमी पेडनेकर यांचा ‘बधाई दो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे.

या चित्रपटात शार्दुल ठाकूरची भूमिका राजकुमार रावने तर सुमन सिंगची भूमिका भूमी पेडणेकरने साकारली होती. या चित्रपटात शार्दुल एक गे आहे तर सुमन ही एक लेस्बियन मुलगी आहे.

शार्दुल आणि सुमन हे त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी लपवून ठेवण्यासाठी लग्न करतात. मात्र त्यांचं आयुष्य सामान्य पती पत्नीसारखं नसतं. सुमनला मुलींमध्ये लैंगिक आकर्षण आहे तर शार्दुलला मुलांमध्ये असतं.

एखाद्या पुरूषाचा लैंगिक कल स्त्रीपेक्षा पुरूषाकडे अधिक असेल तर तो पुरूष समलिंगी आहे. तेच जर एका स्त्रीचा लैंगिक कल पुरूषांपेक्षा स्त्रीकडे जास्त असेल तर तिला लेस्बियन म्हटलं जातं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एखादा अविवाहीत मुलगा आणि एक लेस्बियन मुलगी लग्न करते तेव्हा ते समाजात सामान्य पती पत्नीसारखे दिसतात. त्याला Lavender marriage असं म्हणतात.

Lavender marriage हे लग्न समाजात इज्जत वाचवण्यासाठी तसेच वैयक्तिक समस्या लपवण्यासाठी केलं जातं. या लग्नामुळे त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही.

‘बधाई दो’ या चित्रपटातही असच शार्दुल आणि सुमन लग्न करतात. आणि नंतर ते रूममेट म्हणून राहत असल्याचं दाखवलं आहे.

दरम्यान, 6 सप्टेंबर 2018 रोजी दोन समलैंगिकांचे संबंध कायदेशीर केले होते. न्यायालयाने कलम 377 मधील तरतुद काढून टाकली होती. त्यामध्ये 2 समान लिंग असणाऱ्या व्यक्तींना संबंध ठेवण्याची अनुमती नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या – 

“महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, मोदींनी शिवजयंतीला माफी मागून प्रायश्चित करावं”

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी