मुंबई | देशभरात नावाजलेले शो मॅन राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर आणि राजीव कपूर या दोन भावंडांचं एकापाठोपाठ एक निधन झालं. फेब्रुवारी 2021 मध्ये अभिनेता राजीव कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. तर त्या अगोदर अभिनेता ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. या दोघांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती.
अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या मृत्यूचे दुःख व्यक्त केलं होतं. दोन्ही भावंडांच्या एकापाठोपाठ झालेल्या निधनानंतर कपूर कुटुंब दुःखात बुडालं होतं. ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचे भाव रणधीर कपूर यांच्यासाठी हा एक मोठा झटकाच होता.
राजीव कपूर यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं, याबद्दल आता रणधीर कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यांनी नुकतंच एका वृत्तवाहिणीसाठी लेख लिहिला आहे. या लेखात रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
राजीव यांच्या निधनाच्या आदल्याच रात्री आपल्यात संवाद झाल्याचं रणधीर कपूर यांनी म्हटलं आहे. भावाच्या निधनाच्या सहा महिन्यानंतर त्या दिवशीच्या अनेक गोष्टींचा खुलासा रणधीर कपूर यांनी या लेखात केला आहे.
या लेखात रणधीर कपूर म्हणाले आहेत की, त्या रात्री दोन वाजले होते. राजीवच्या खोलीतील सर्व लाईट्स चालू होत्या. यामुळे मी त्याच्या खोलीत गेलो तर तो मला पीत बसलेला दिसला. मी त्याला पिणं थांबव आणि झोप, असं सांगून माझ्या रुममध्ये परतलो. तो त्याच्यातील आणि माझ्यातील शेवटचा संवाद होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नर्स माझ्याकडे धावत आली आणि तिने मला राजीवच्या पल्स कमी जास्त होत असल्याचं सांगितलं. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तासभरात तो आम्हाला सोडून निघून गेला. ऋषीला कॅन्सर होता यामुळे तो केव्हाही आम्हाला सोडून जाईल, याची धास्ती होतीच. परंतु राजीव असं जाईल, हे वाटलं नव्हतं, असं देखील रणधीर कपूर यांनी या लेखात म्हटलं आहे.
दरम्यान, राजीव कपूर हे राज कपूर यांचे सर्वात धाकटे पुत्र होेते. राजीव कपूर यांनी देखील बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. राम तेरी गंगा मैली, एक जान है हम, हे त्यांचे नावाजलेले चित्रपट आहेत. परंतु राजीव कपूर यांनी फार कमी चित्रपटांत काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल
लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…
ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या नादात भररस्त्यात आई बाळाला विसरली अन्…; पाहा व्हिडीओ
‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष
अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!