मुंबई | भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं? भाजप नेत्यांची चौकशी का केली नाही? त्यांना कोर्टात का उभं केलं नाही? असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून गोळा करण्यात आली आहे.
ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत, असं नवाब मलिकांनी सांगितलं आहे.
भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही? हे तपास का थांबले आहेत? याची माहिती घेणार आहेत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या गतीमान करा असं आवाहनही ईडी अधिकार्यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. आता द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर यातून सत्यबाहेर काढण्याची एनसीबीची जबाबदारी आहे, असं मलिकांनी म्हटलंय.
मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून हे ड्रग्जचं रॅकेट सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा. मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता हे न पाहता ड्रग्जच्या खेळाला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही मलिकांनी केली आहे.
या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी 1985 मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद
“अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण