वर्षाच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत काय बदल झाला? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात तर सोन्याचे भाव प्रचंड वाढतील, अशी शक्यता अनेक अर्थतज्ञ वर्तवत आहेत.

सध्या भारतात सोने आणि चांदीच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळे भारतात देखील त्याचे प.डसाद उमटत आहेत. वर्षाच्या अखेर सोन्याचे दर 50000च्या आसपास राहत आहेत.

बुधवारी एमसीएक्समध्ये सोन्याच्या किंमतीत 0.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच बुधवारी सोन्याचे दर 114 रुपयांनी वाढले आहेत. याप्रमाणे प्रती तोळा सोन्याचा दर 50,153 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत देखील बुधवारी 1.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच बुधवारी चांदीचा दर 703 रुपयांनी वाढून 68,800 रुपये प्रती किलोवर पोहोचले आहेत.

2021 मध्ये सोन्याचा दर 63000 रुपये प्रती तोळा जाण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याची किंमत उच्चांकी स्तरावरून जवळपास 6000 रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची हीच वेळ असल्याची जाणकारांचं म्हणनं आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

महत्त्वाच्या बातम्या-