Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूला जवळपास पाच महिने उलटून गेले आहेत. तरी देखील दिवसेंदिवस या प्रकरणातील गुंता वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणातील गुंता सोडविण्यासाठी सीबीआय, एनसीबी आणि ईडी सारख्या उच्च दर्जाच्या एजन्सी शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या ‘राबता’ चित्रपटाच्या पेमेंटचा घोटाळा समोर आला होता. सुशांतला राबता चित्रपटासाठी मिळालेल्या 17 कोटींचा हिशोब अद्याप लागला नाही. हा हिशोब लावण्यासाठी ईडीने सुशांतचे सर्व बँक डिटेल्स चेक केले. तसेच सर्व शक्यता देखील पडताळून पहिल्या.

मात्र, सर्व बँक व्यवहार तपासून देखील सुशांतच्या कोणत्याच खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे दिसत नाही. मग सुशांतचे 17 कोटींचे पेमेंट कोठे व कसे झाले? याबाबत ईडीने यापूर्वीच राबता चित्रपटाचे निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे माहिती मागितली होती.

ईडीने माहिती मागितल्यानंतर दिनेश यांनी ईडीकडे काही कागदपत्रे सोपविली होती. मात्र, या कागदपत्रांमधून कोणतीही स्पष्टता होत नसल्याचं ईडीचं म्हणणं आहे. यामुळे ईडीने आता पुन्हा एकदा दिनेश यांना चौकशीसाठी बोलावल्याचं सूत्र सांगतात.

दिनेश विजयन हे सध्या दुबईमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी विजयन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाचे कारण देत चौकशीसाठी असमर्थन दर्शवले होते. मात्र, आता ईडी पून्हा एकदा विजयन यांना चौकशीसाठी बोलावणार आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सीबीआयला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सुगावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी तपास सुरु केला. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं.

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या विरोधात पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला देखील अ.टक केलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली आहे.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. तसेच आता कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष याला देखील एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट

एकीकडे पत्नी प्रेग्नंट तर दुसरीकडे सैफ अलीच्या मुलासाठी येत आहेत लग्नाचे प्रस्ताव

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यामुळे आरोह वेलणकर आणि महेश टिळेकर भिडले, एकमेकांवर टीका करत म्हणाले…

…म्हणून आमीर खान अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा! कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

‘या’ बड्या अभिनेत्रीवर आधी चाकूने ह.ल्ला आता जीवे मा.रण्याची धमकी, अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी साद