जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर काय होईल???

नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील कलं 370 हटवण्याची शिफारस अमित शहांनी राज्यसभेत केली आहे. मात्र कलम 370 हटवल्याने काय होईल??? हे पाहणं महत्वाचं आहे. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार जम्मू आणि काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. भारतीय संविधानांतर्गत जम्मू आणि काश्मीरचे स्वतंत्र संविधान आहे.

 कलम 370 हटवलं तर काय होईल ???

-जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर जम्मू काश्मीरला स्वायंत्त राज्याचा दर्जा राहणार नाही. 

-एखादा नवा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यक्यता नाही. 

-कलम 370 हटवल्याने राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकेल.

-370 कलमांतर्गत ’35 ए’मुळे मिळालेले अधिकारही निघून जातील.

-कलम 370 हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.

-जम्मू काश्मीरमधील स्वतंत्र संविधान इतिहासजमा होईल. भारतीय संविधानाचे पालन करावे लागेल. 

-जम्मू काश्मीरमधीर दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येईल. 

-भारतीयांना काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार मिळेल. 

-भारतीय संसद सर्वोच्च संसद असेल.

 कलम 370 काय आहे???

1947 साली भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंह यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी भारताकडे मदत मागितली.

केंद्र सरकार आणि हरिसिंह यांच्यामध्ये 26 ऑक्टोबर 1947 रोजी विलीनीकरणाचा करार झाला आणि कलम 370 अस्तित्वात आले. जम्मू काश्मीरमध्ये पहिले हंगामी सरकार स्थापन केल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला यांनी भारतीय संविधानाच्या कक्षेबाहेर राहण्याची शिफारस केली.

 ‘कलम 35 ए’ काय आहे???

14 मे 1954 साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार कलम 370 अंतर्गत कलम 35 ए जोडण्यात आले. कमल 370मुळे जम्मू काश्मीरला आधीच विषेश राज्याचा दर्जा मिळाला होता. कलम 35 ए मुळे जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारला स्वतंत्र संविधान आणि काही विशेष कायदे तयार करण्याचे अधिकार मिळाले.

महत्वाच्या बातम्या-

-ईव्हीएम गेलं तर भाजपही जाणार; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

-“देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार!!!”

-“आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता”

-सौ सौ सलाम आपको…!; परेश रावलांनी केलं मोदींचं कौतुक

-मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; जम्मू-काश्मीरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय