Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

आता कंगनाचं काय खरं नाही! पोलिसांची सलग तिसऱ्यावेळी कंगनाविरुद्ध मोठी कारवाई

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना आणि वा.द हे समीकरण काय नवीन नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर कंगनानं बॉलीवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या गोष्टींसह काही पक्षांवरही उघडपणे टी.का केली आहे. कंगना काहीतरी बोलली आणि वा.द झाला नाही, असं क्वचितच घडत असेल.

बॉलीवूड मधील नेपो.टीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कंगना राणावतनं केलेल्या एका ट्वीटमुळे तिला आणि तिची बहिण रंगोली हिला अ.टक होऊ शकते.

कंगना रानावातनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी दोनवेळा समन्स बजावला होता. मात्र, कंगना दोन्हीवेळी चौकशीसाठी हजर झाली नाही. कंगनाला आता मुंबई पोलिसांनी तिसऱ्यावेळी समन्स बजावला आहे.

त्यामुळे आता येत्या 23 नोव्हेंबरला कंगनाला आणि 24 नोव्हेंबरला रंगोलीला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. कंगना यावेळी चौकशीसाठी हजर राहणार की नाही?, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी कंगनाला दोनवेळा समन्स बजावला होता. यातील एका समन्सला उत्तर देताना कंगनाने घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं होतं. तर दुसऱ्या समन्सला कंगनाने काहीही उत्तर दिलं नव्हतं.

दरम्यान, कंगना राणावत आता याप्रकरणी पुढे काय करणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच कंगना राणावत ग.जाआड जाणार का?, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आता अभिनेता अमित साधसुद्धा सुशांतवर बोलला; ‘त्या’ विमान प्रवासाची आठवण काढत म्हणाला…

धक्कादायक! आता ‘या’ प्रकरणी चक्क महाराष्ट्राच्या राज्यपालांचीच सुप्रीम कोर्टात धाव

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या मिलिंद सोमणला चाहत्यांनी ‘या’ कारणाने डोक्यावर घेतलं!

खुशखबर! तरुणाईची लाडकी ‘पब्जी’ आता भारतात पुन्हा येणार?

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…